Local Updates2 min read
RT by @AkshayRajguru5: विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधातील हा संघर्ष न्याय मिळेपर्यंत थांबणारा नाही!
4/10/2026, 7:00:19 pm · Pune · Local Updates
By @x_satejp

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधातील हा संघर्ष न्याय मिळेपर्यंत थांबणारा नाही! #MPSC #Satyagraha #pune Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) पुणे येथे सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आज भेट देऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने खंबीर आणि बिनशर्त पाठिंबा दिला. तसेच आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डिग्री आहे, पण नोकरी नाही; परीक्षा आहे, पण पेपरफुटीचा धोका आहे! वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असताना सरकारने केवळ बैठका आणि आश्वासनांपुरते न राहता ठोस निर्णय घेतले पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याचा प्रकार आता खपवून घेतला जाणार नाही. सचिवांची बदली करून प्रश्न सुटत नाही. पेपरफुटी आणि परीक्षेतील गैरप्रकारांची जबाबदारी निश्चित करून MPSC अध्यक्षांचा राजीनामा झालाच पाहिजे, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी असून काँग्रेस पक्षाचीही हीच स्पष्ट भूमिका आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या नावाखाली निवडणूक प्रक्रियेचे केंद्रीकरण आणि त्याच धर्तीवर ‘वन नेशन, वन एक्झामिनेशन’च्या माध्यमातून परीक्षांवर नियंत्रण आणण्याची प्रवृत्ती लोकशाहीतील विविधता आणि समान संधीसमोर गंभीर प्रश्न निर्माण करते. निवडणूक असो किंवा परीक्षा, प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असलीच पाहिजे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते मा. राहुलजी गांधी यांनीही पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांचा संघर्ष, त्यांच्या भावना आणि मागण्या राहुलजी गांधींपर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही यावेळी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या व्यवस्थेला जाब विचारल्याशिवाय हा लढा थांबणार नाही! यावेळी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य मा. बाळासाहेबजी थोरात, आमदार रोहितदादा पवार, आमदार विश्वजीत कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. #MPSC #Satyagraha #Pune Video — https://nitter.kareem.one/INCHarshsapkal/status/2106420402100818409#m
Source: https://x.com/satejp/status/2106659190358134800
