
Local UpdatesPune2 min read
तुमचे बोचरे शब्द आम्हालाही कळतात. पण विद्यार्थ्यांचे वर्ष, संधी आणि भविष्य धोक्यात येत असेल, तर जबाबदारी निश्चित करणे ही शाश्वत सुधारणेची पहिली पायरी आहे. राजीनामा + चौकशी + संरचनात्मक सुधारणा — तिन्ह
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@DimagiVichar158)
Shared on NeshSource: X (@DimagiVichar158)
Read originalतुमचे बोचरे शब्द आम्हालाही कळतात. पण विद्यार्थ्यांचे वर्ष, संधी आणि भविष्य धोक्यात येत असेल, तर जबाबदारी निश्चित करणे ही शाश्वत सुधारणेची पहिली पायरी आहे. राजीनामा + चौकशी + संरचनात्मक सुधारणा — तिन्ही आवश्यक. फक्त शब्दांचे बाण मारून दोन्ही दगडांवर पाय ठेवू नका. #MPSC #PUNE Satyajeet Tambe (@satyajeettambe) ‘शाश्वत उपाययोजना की क्षणिक समाधान?’ या विषयावर लवकरच मी आपल्या सर्वांसोबत सविस्तर संवाद साधणार आहे. मात्र, त्यापूर्वी माझी भूमिका थोडक्यात आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनाच्या निमित्ताने अनेक विद्यार्थी मित्रांनी "तुम्ही आंदोलनात दिसले नाहीत" अशा स्वरूपाचे फोन केले. मला सोशल मीडियावरही ट्रोलच्या स्वरूपात प्रश्न विचारण्यात आले. शेवटी मी युवकांचा प्रतिनिधी असल्याने आणि लोकशाहीत प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य असल्याने ते रास्तच आहे. गेले काही दिवस माझ्या पूर्वनियोजित कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेर असल्यामुळे मी आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकलो नाही; मात्र MPSC च्या सुरू असलेल्या आंदोलनास माझा पाठिंबाच आहे. युवकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या या प्रश्नावर कोणीही शांत बसू शकत नाही. आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजे, हेही खरेच आहे. मात्र आजपर्यंत रेल्वे अपघातांमध्ये रेल्वेमंत्र्यांनी राजीनामे दिले, विमान अपघातात नागरी उड्डाण मंत्र्यांनी राजीनामे दिले, कॉमनवेल्थ गेम्समध्ये अध्यक्ष तुरुंगात गेले, 2G घोटाळ्यात अनेक राजीनामे झाले, नुकत्याच NEET पेपरफुटीतून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. पण खरंच प्रश्न सुटला का हो? सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। हा विचार आंदोलनात खरे तर असला पाहिजे, पण दुर्दैवाने जेव्हा प्रश्न उभे राहतात तेव्हा राजकारण सुरू होते. परवाच मी राज ठाकरे यांचे आंदोलनातील परखड आणि रोखठोक भूमिका मांडणारे भाषण ऐकले, ते एकदम खरे बोलले. त्यामुळे या MPSC आंदोलनाला पाठिंबा देताना मी एवढेच म्हणेन की "मी स्वतः विद्यार्थी चळवळीतून आलेला कार्यकर्ता असल्याने विद्यार्थ्यांसोबतच आहे. आंदोलन हे लक्ष वेधण्याचे उत्तम साधन आहे, पण साध्य काय करायचंय 'शाश्वत उपाययोजना की क्षणिक समाधान', हेही ठरवले पाहिजे." #MPSC #Protest #FutureGenerations — https://nitter.kareem.one/satyajeettambe/status/2108072295482769762#m
This report has not been independently verified by Nesh.
