Local UpdatesMumbai2 min read
RT by @MMMOCL_Official: मुंबई मेट्रो मार्गिका 12-अ ला मंजुरी, औद्योगिक व लॉजिस्टिक केंद्रांशी संपर्क वाढणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सु
Added to Nesh: · Mumbai · Local Updates
Source: X (@CMOMaharashtra)
Shared on NeshSource: X (@CMOMaharashtra)
Read originalमुंबई मेट्रो मार्गिका 12-अ ला मंजुरी, औद्योगिक व लॉजिस्टिक केंद्रांशी संपर्क वाढणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. मानपाडा-काटई नाका ते तळोजा (कल्याण फाटा मार्गे) या भागाला जोडणाऱ्या 18.40 किमी लांबीच्या मुंबई मेट्रो मार्गिका 12-अ ला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली. हा मार्ग पुढील साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. मेट्रो मार्गिका 12-अ मुळे औद्योगिक आणि लॉजिस्टिक केंद्रांशी संपर्क वाढण्याबरोबरच कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई शहरांमधील वाहतूक जोडणी अधिक सक्षम होणार आहे. तसेच, राज्यातील सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांचा वेग वाढवून ती वेळेत पूर्ण होतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या. ही संपूर्ण मेट्रो मार्गिका उन्नत असून, त्यावर 12 स्थानके प्रस्तावित आहेत. प्रकल्पात 6.93 किलोमीटर लांबीचा चारपदरी आणि 8.69 किलोमीटर लांबीचा सहापदरी एकात्मिक उड्डाणपूल समाविष्ट आहे. या मार्गिकेवर दररोज 4,74,000 प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. काटई नाका येथे मेट्रो मार्गिका 12 व बुलेट ट्रेन जोडमार्ग, काटई नाका ते कल्याण फाटा दरम्यान मेट्रो मार्गिका 14 आणि अमनदूत येथे नवी मुंबई मेट्रो मार्गिका 1 शी जोडणी प्रस्तावित आहे. सर्व स्थानकांवर फीडर बससेवाही प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाच्या तुलनेत प्रवासासाठी लागणारा वेळ 40% ते 50% कमी होणे अपेक्षित आहे. सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता आणि विविध वाहतूक माध्यमांतील सुविधा वाढल्याने खासगी वाहनांचा वापर कमी होण्यास मदत होईल. परिणामी, कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट होण्यासह राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची घनता कमी होणे अपेक्षित आहे. प्रवासाचा वेळ कमी करणे, रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करणे, पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना देणे आणि प्रादेशिक आर्थिक विकासासाठी सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करणे ही उद्दिष्टे या प्रकल्पामुळे साध्य होणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. मेट्रो मार्गिका आणि एकात्मिक उड्डाणपुलाच्या अंमलबजावणीसाठी प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली. प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रातील निश्चित शासकीय जमिनी प्रकल्प विकास व निधी उभारणीसाठी प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @cbawankule #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #InfrastructureDevelopment
This report has not been independently verified by Nesh.
