Local UpdatesMumbai1 min read
R to @MMMOCL_Official: मेट्रोचा प्रत्येक प्रवास हा जनजागृती घडवण्याची, महत्त्वपूर्ण विषयांवर संवादाला प्रोत्साहन देण्याची आणि बालकांच्या संरक्षणाप्रती आपली सामूहिक जबाबदारी अधिक बळकट करण्याची संधी ठरू
Added to Nesh: · Mumbai · Local Updates
Source: X (@MMMOCL_Official)
Shared on NeshSource: X (@MMMOCL_Official)
Read originalमेट्रोचा प्रत्येक प्रवास हा जनजागृती घडवण्याची, महत्त्वपूर्ण विषयांवर संवादाला प्रोत्साहन देण्याची आणि बालकांच्या संरक्षणाप्रती आपली सामूहिक जबाबदारी अधिक बळकट करण्याची संधी ठरू शकतो. डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र. से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांच्या नेतृत्वाखाली आणि श्री. कन्हुराज बागाटे, भा. प्र. से., व्यवस्थापकीय संचालक, महा मुंबई मेट्रो यांच्या हस्ते #RukJaoVarnaPOCSOPakadLega या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अर्पण संस्थेच्या संस्थापक श्रीमती पूजा तापरिया यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. बालसुरक्षा सप्ताहाच्या (१४ ते २० नोव्हेंबर) निमित्ताने एमएमआरडीए, महा मुंबई मेट्रो आणि अर्पण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा सीएसआर उपक्रम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मेट्रो ट्रेनमधील संदेश आणि स्थानकांवरील माहितीपर स्टँडीजच्या माध्यमातून बालकांच्या संरक्षणाचा संदेश थेट प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. बालकांच्या लैंगिक शोषणासारख्या संवेदनशील विषयाभोवती असलेले मौन दूर करणे, पोक्सो कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच शोषणाची लक्षणे ओळखून त्याविरोधात आवाज उठवण्यास व संशयास्पद घटनांची तक्रार करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कारण, बालकांचे संरक्षण ही केवळ जबाबदारी नाही, तर ती आपल्या सर्वांची सामूहिक वचनबद्धता आहे.
This report has not been independently verified by Nesh.
