
Local UpdatesMumbai1 min read
R to @AshwiniBhide: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (MMRC) आज दीपप्रज्वलनाने चा शुभारंभ करण्यात आला. यावर्षीची संकल्पना “समृद्धीसाठी नीतिमत्ता” (Probity for Prosperity) अश
Added to Nesh: · Mumbai · Local Updates
Source: X (@MumbaiMetro3)
Shared on NeshSource: X (@MumbaiMetro3)
Read originalमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (MMRC) आज दीपप्रज्वलनाने #VigilanceAwarenessWeek2026 चा शुभारंभ करण्यात आला. यावर्षीची संकल्पना “समृद्धीसाठी नीतिमत्ता” (Probity for Prosperity) अशी आहे. या प्रसंगी संचालक (नियोजन) श्री. आर. रमणा, संचालक (प्रणाली) श्री. राजीव, संचालक (वित्त) श्री. योगेंद्र सक्सेना, संचालक (प्रकल्प) श्री. गौतम बिऱ्हाडे प्रधान कार्यकारी संचालक (सिग्नल व दूरसंचार आणि आयटी) श्री. राजीव कुमार, कार्यकारी संचालक (ट्रॅक) श्री. मोहम्मद आसिम सुलेमान, कार्यकारी संचालक (विद्युत) श्री. प्रफुल्ल वाघ, सल्लागार (स्थापत्य) श्री. विजय किटके तसेच MMRC चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी MMRC च्या कर्मचाऱ्यांनी #IntegrityPledge घेऊन सचोटी, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मूल्ये जपत भ्रष्टाचारमुक्त राष्ट्राच्या उभारणीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला. दि. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित दक्षता जनजागृती सप्ताहातून सार्वजनिक सेवेत नैतिकता, नीतिमत्ता आणि सचोटीचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे. #ProbityForProsperity #MMRC
This report has not been independently verified by Nesh.
