
Local UpdatesMumbai1 min read
महा मुंबई मेट्रोच्या वतीने भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार, स्वातंत्र्य, न्याय, सन्मानाने जगण्याची हमी आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्
Added to Nesh: · Mumbai · Local Updates
Source: X (@MMMOCL_Official)
Shared on NeshSource: X (@MMMOCL_Official)
Read originalमहा मुंबई मेट्रोच्या वतीने भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार, स्वातंत्र्य, न्याय, सन्मानाने जगण्याची हमी आणि लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे बळ दिले. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान मसुदा समितीने तसेच संविधान सभेतील अनेक मान्यवर सदस्यांच्या योगदानातून साकारलेल्या संविधानाने भारताच्या लोकशाहीचा भक्कम पाया घातला. नागरिकांचे मूलभूत अधिकार, विविधतेचा स्वीकार आणि समतेच्या मूल्यांवर आधारलेले संविधान हे प्रत्येक भारतीयाच्या हक्कांचे संरक्षण करणारे आणि अधिक न्याय्य समाजनिर्मितीला दिशा देणारे प्रेरणास्थान आहे. या संविधानिक मूल्यांचा आदर आपण सगळे राखूया. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महा मुंबई मेट्रोची अखंड वाटचाल सुरू आहे. कारण विकासाच्या प्रवासात प्रत्येकाला जोडणे, ही देखील समता आणि सर्वसमावेशकतेच्या विचारांची कृतिशील अभिव्यक्ती आहे. #संविधान_दिन #ConstitutionDay #DrBabasahebAmbedkar #MMRDA #MahaMumbaiMetro #Mumbai @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee
This report has not been independently verified by Nesh.
